शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

लिंबाचे उपासाचे गोड लोणचे / Limbache Upasache God Lonche

लिंबाचे उपासाचे/गोड लोणचे



(सर्व सामग्री रेखांकित केली आहे ) 

साधारण १२ छोटी लिंबे घेउन ती स्वच्छ धुऊन  कोरडी करावीत. लिंबांच्या आवडतील तेवढ्या मोठ्या फोडी कराव्यात. फोडींचे ५ समान भाग करावेत. फोडींच्या एका भागा एवढे मीठ घ्यावे व लिम्बांच्या फोडींवर घालावे. सर्व मिसळून एका बरणीत बंद करून ५-६ दिवस मुरायला ठेवावे. एका पातेल्यात ३ वाट्या साखर घेऊन त्याचा गोळीबंद पाक* करावा. त्यात चवीप्रमाणे तिखट व मिठात मुरलेल्या फोडी घालाव्यात. सगळे गॅस वर ठेऊन एक उकळी आणावी.  हे लोणचे वर्षभर सुद्धा टिकते. 

*गोळीबंद पाक- एका पातेल्यात साखर घेउन त्यात साखर बुडेल इतके पाणी घालावे. मध्यम गॅस वर ठेऊन सतत हलवावे. उकळी आल्यानंतर साधारण ५-६ मिनिटांनी पाकाचे दोन थेंब ताठलीत घेऊन बोटांनी गोळी करता येते का ते बघावे. तसे करता यॆईपर्यन्त उकळावे व गॅस बंद करावा. ह्या पाकाला गोळीबंद पाक असे म्हणतात. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा