तोंडल्याची भाजी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. तोंडल्यांचे गोलाकार व पातळ काप करून घ्यावेत. खालील प्रमाण साधारण २ वाट्या तोंडल्यांच्या चकत्यांसाठी आहे.
२. एका कढईत ३ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी.
३. मोहरी तडतडल्यावर त्यात एक चिमूट हिंग, व १/४ टीस्पून हळद घालावी.
४. त्यात तोंडल्यांच्या चकत्या घालाव्यात व सर्व दोन मिनिटे परतावे.
५. चवीप्रमाणे मीठ, तिखट, २ टीस्पून काळा /गोडा मसाला, व १/२ टीस्पून साखर घालून सर्व मिसळावे व झाकण ठेऊन शिजू द्यावे.
५. तोंडली मऊसर शिजल्यावर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व ही भाजी पोळीबरोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा