शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

गुळाची पोळी / Gulachi poli

गुळाची पोळी


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे) 

तीन वाट्या कणीक१ वाटी मैदा, व एक वाटी बेसन एका परातीत घ्यावे. त्यात पाव वाटी गरम तेल व १ छोटा चमचा (१ टीस्पून) तूप घालून पुरीच्या कणकेप्रमाणे घट्ट मळावे. २ वाट्या किसलेला गूळ घ्यावा. त्यात १ टेबलस्पून भाजलेली खसखस१ टीस्पून वेलदोड्याची पूड घालावी. १ वाटी बेसनपाव वाटी तेलात खमंग गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यावे व ते गुळात मिसळावे. बेसनाच्या ऐवजी १ वाटी डाळं मिक्सर मधून बारीक करून घातले तरी चालेल. आता तेलाचा हात घेऊन गूळ चांगला मळून घ्यावा. गूळ पेढ्याप्रमाणे मऊ व्हायला हवा. कोरडा वाटल्यास परत तेलाचा हात घेउन खूप मळावे. कणीक व गूळ एकसारखे घट्ट व्हायला हवेत. आता पुऱ्याप्रमाणे कणकेचे छोटे छोटे भाग करावेत. तसेच गुळाचेही छोटे छोटे भाग करावेत. दोन कणकेच्या गोळ्यांमध्ये एक गुळाचा गोळा ठेऊन कड, थोडी थोडी जागा ठेऊन,बंद करावी. आता त्याची पातळ पोळी लाटावी. व तव्यावर दोन्ही कडून भाजावी. असेच सर्व गोळ्यांने करावे. ही पोळी घट्ट तुपाबरोबर खायला द्यावी. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा