कणकेचा शिरा :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. एका कढईत ४ & १/२ टेबलस्पून तूप घ्यावे व त्यात १ वाटी कणीक तपकिरी रंगाची होईपर्यंत भाजून घ्यावी.
२. त्यात २ वाट्या गरम पाणी घालावे व सर्व चांगले मिसळून, झाकण ठेऊन मंद आचेवर एखादा मिनिट शिजू द्यावे.
३. मग त्यात १ वाटी साखर घालावी व परत सर्व मिसळावे. झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजू द्यावे.
४. वरून आवडत असल्यास बदामाचे काप घालावेत व गरम शिरा खायला द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा