पाककृती

खायचा पदार्थ जरी तोच असला तरी त्याची चव व बनवायची पद्धत प्रत्येक घरात निराळी असते. विविध पदार्थ बनवायच्या काही महत्वपूर्ण टिपा व सूचना एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेहमीच पोचविल्या जातात.

माझी आई व माझ्या सासूबाई दोघीही उत्तम स्वयंपाक करतात. त्या दोघींनी मला एवढे सगळे चविष्ठ व रुचकर पदार्थ खाऊ घातल्याबद्दल व ते बनवायला शिकविल्याबद्दल मी त्या दोघींची खूप खूप आभारी आहे.

मी ह्या वेबसाईट वर अश्याच काही पारंपारिक पदार्थांची कृती प्रकाशित करत आहे. येथे दिलेले बहुतेक सर्व पदार्थ स्वयंपाकघरातील आधुनिक उपकरणे वापरून बनविले आहेत.

उजव्या बाजूस असलेला मेनू वापरून पदार्थ बघावेत व त्यातील पदार्थ करून बघितल्यावर आपला अभिप्राय जरूर सांगावा, ही विनंती.