शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

तिखट -मिठाच्या पुऱ्या / Tikhat Mithachya Purya

तिखट -मिठाच्या पुऱ्या :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१ वाटी कणीक१ टेबलस्पून रवाचवीप्रमाणे तिखट व मीठ१/२ टीस्पून ओवा१ टीस्पून हळद१ टेबलस्पून गरम करून तेल, हे सर्व एकत्र करून पाण्याने घट्ट कणीक मळावी. वाटल्यास वरून तेलाचा हात लावावा. कणीक पोळ्यांच्या कणकेप्रमाणे सैल नसावी पण लाटताना भेगा पडतील इतकी घट्ट ही नसावी.  एका कढईत तळण्यासाठी तेल गरम  करायला ठेवावे. कणकेचे एकसारखे १ इंचाचे गोळे करून घ्यावेत. एक गोळा हातांमध्ये गोल फिरवून दाबावा व पोळपाटावर त्याची अंदाजे २ मि. मी. जाड पुरी लाटावी व गरम तेलात तळून काढावी. पुरी तेलात सोडल्यावर काही सेकंदाताच फुगते. मग ती तेलातच उलटावी व गुलाबी रंगाची होईपर्यंत तळावी. एका पेपर टॉवेल वर काढावी. असेच सर्व कणकेच्या गोळ्यांचे करावे. गरम गरम पुऱ्या, लोणचे किंव्हा केचप बरोबर खायला द्याव्यात. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा