रविवार, १२ एप्रिल, २०१५

वसंताची चाहूल

वसंताची चाहूल


बर्फाचे संचित ढीग वितळले
हरित कोवळे गवत पसरले

हिरव्या गवतामधे उमलले
फूल मनोहर तांबुस पिवळे

ऋतुचक्राचे पुढचे पाऊल
वसंतऋतुची लागे चाहूल

सूर्याची आली ऊब हवेत
जीवजंतूंना घेई कवेत

शुष्क वाळके वृक्ष बहरती
नव पल्लव जन्मास घालती



दुरावलेले कोकिल काक
परतले उबेची ऐकुनी हाक

प्राण्यांचे शावक झोपून उठती
अन्न शोधण्या दुडुदुडु पळती

लपलेल्या मधुमक्षिका भुंगे
वनी खेळती सुमनांसंगे

मुलेही उत्सुक मौज कराया
अभ्यास सोडुनी मुक्त पळाया

लहान मोठे म्हणती सारे
थंडीतुनि सुटका झाली पहारे

फळाफुलांनी खुलली धरणी
अजब असे देवाची करणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा