शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

परतलेल्या बटाट्याची भाजी / Paratlelya Batatyachi Bhaji

परतलेल्या बटाट्याची भाजी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. दोन बटाटे साल काढून धुऊन घ्यावेत. प्रत्येक बटाट्याचे १/४ काप करून घ्यावेत. प्रत्येक १/४ भागाच्या पातळ चकत्या कापाव्यात. 

२. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करून घ्यावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग१/२ टीस्पून हळद, व २ हिरव्या मिर्च्या उभ्या चिरून घालाव्यात. त्यातच १ छोटा कांदा उभा चिरून घालावा व कांदा किंचित गुलाबी होईपर्यंत परतावे. 

३. आता बटाट्याच्या चकत्या घालून सगळे मिसळावे व बारीक ते मध्यम आचेवर परतावे. दर २-३ मिनिटांनी हलवायला विसरू नये. बटाटे अर्धवट शिजल्यावर त्यात १/४ टीस्पून साखर, व चवीप्रमाणे मीठ घालावे. हिरव्या मिर्च्यांच्या ऐवजी तिखट वापरले तरी चालेल. तसे करायचे असल्यास, फोडणीत मिर्च्या न घालता, मिठाबरोबरच चवीप्रमाणे तिखट घालावे.

४. बटाटे पूर्ण शिजेपर्यंत परतावे. 



५. बटाट्याची भाजी गरम पोळी बरोबर वाढावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा