शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

काळा मसाला (गोडा मसाला) / Kala/Goda Masala

काळा मसाला (गोडा मसाला)


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

५०० ग्राम (२ वाट्या) धने२०० ग्राम (१ & १/४ वाटी) जिरे१० ग्राम (१ टीस्पून) प्रत्येकी लवंगा, वेलदोडे, दालचीनी, शहाजिरे, हिंग, तमालपत्र, धोंडफूल (दगडफूल), मसाला वेलदोडे, जायफळ, मिरे, मोहरी, खसखस, कढीपत्ता, हळकुंड किंव्हा हळद, सुके किसलेले खोबरे. वरील सर्व पदार्थ वेगवेगळे थोड्या तेलावर खमंग परतून घ्यावेत. चवीप्रमाणे तिखट व मीठ घालून सर्व अगदी बारीक होईपर्यंत ग्राइण्डर  मध्ये दळावे. 

हा गोडा मसाला महाराष्ट्रीय जेवणात भाजी, आमटी, रस्सा व उसळींमध्ये वापरतात. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा