शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

सांभार मसाला / Sambhar Masala

सांभार मसाला :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. ४ टीस्पून धने गुलाबी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावेत. 

२. एका काढईत १ & १/२ टीस्पून तेल गरम करून त्यात ३-४ कढिलिंबाची पाने२ लवंगा१०-१२ काळे मिरे१/२" दालचीनीचा तुकडा, व ४ वाळलेल्या लाल मिर्च्या छोटे तुकडे करून घालाव्यात. त्यातच १ & १/२ टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, व १ & १/२ टेबलस्पून उडदाची डाळ घालावी. शेवटी १/४ टीस्पून हिंग घालून सगळे २ मिनिटे परतावे. 

३. भाजलेले धने व इतर मसाला एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक दळावा. 

४. तयार सांभार मसाला एका हवा-बंद डब्यात भरून ठेवावा. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा