शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

फोडणीचे वरण / Fodniche Waran

फोडणीचे वरण :(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)


१ वाटी तुरीची डाळ धुऊन त्यात २ वाट्या पाणी घालावे. प्रेशर कुकर मधे ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे व गॅस ५ मिनिटांसाठी बारीक करावा. गॅस बंद करून, कुकर गार झाल्यावर शिजलेली डाळ बाहेर काढावी. एका पातेल्यात, ४ टीस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १ टीस्पून जिरे१/४ टीस्पून हिंग, व १ टीस्पून हळद घालावी. त्यावर २ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिर्च्या५-६ कढीलिंबाची पाने१" आलं किसून, व ४ मोठ्या लसणाच्या पाकळ्या बारीक तुकडे करून (अंदाजे १ टेबलस्पून), घालाव्यात. लसणाच्या पाकळ्यांचा रंग गुलाबी होईपर्यंत परतावे. मग गॅस बारीक करून त्यावर शिजलेली डाळ घालावी. आवडीप्रमाणे पाणी घालावे व चवीप्रमाणे मीठ घालावे. वरून १ टोमॅटो बारीक चिरून घालावा. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम वरण, पोळी किंव्हा भाताबरोबर वाढावे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा