शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

ओल्या नारळाची मद्रासी चटणी / Olya Naralachi Madrasi Chutney / Coconut Chutney

ओल्या नारळाची मद्रासी चटणी :



(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१ वाटी ताजं खोवलेलं खोबरे४-५ कढीलिंबाची पाने२ टेबलस्पून डाळं, आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळे मिक्सर मध्ये बारीक वाटावे. एका छोट्या कढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून राई (बारीक मोहरी) घालावी. तडतडल्यावर त्यात १/४ टीस्पून हिंग२ वाळलेल्या लाल मिर्च्या मध्ये दोन भागात तोडून, व १ टीस्पून उडदाची डाळ घालावी व गुलाबी रंगाची होईपर्यंत परतावी. गॅस बंद करावा व ही फोडणी वाटलेल्या खोबऱ्यात घालावी व सर्व मिसळावे. ही चटणी डोसा, मेदू वडे, किंव्हा इडली बरोबर खायला द्यावी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा