शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

झुणका / Jhunka

झुणका (४ जणांसाठी):


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

  1. एका भांड्यात १ वाटी पाणी घेऊन त्यात १ टीस्पून तेल, चवीप्रमाणे मीठ, २-३ टीस्पून तिखट व एक वाटी डाळीचे पीठ (बेसन) घालावे. हातानी गोळे मोडून पाण्यात चांगले मिसळावे. 
  2. एका कढईत  टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात १ टीस्पून मोहरी१/२ टीस्पून हिंग, व १ टीस्पून हळद घालून फोडणी करावी. त्यात आवडत असल्यास १ बारीक चिरलेला कांदा, किंव्हा १ टेबलस्पून लसणाचे बारीक काप घालून २ मिनिटे परतावे. 
  3. वरील पाणी व डाळीच्या पिठाचे मिश्रण फोडणीत ओतावे. मध्यम आचेवर ठेऊन सतत हलवावे व घट्ट होऊ द्यावे. पूर्ण घट्ट झाल्यावर झाकण ठेवावे व ५-१० मिनिटे शिजू द्यावे. 





मधे मधे सारखे करायला विसरू नये. झुणका पातळ नसून कोरडा व घट्ट असतो. 
झुणका, भाकरी किंव्हा पोळीबरोबर छान लागतो. वाढताना बरोबर कच्चा कांदा ही द्यावा. . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा