फ्लॉवर-बटाटा भाजी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. दोन वाट्या फ्लॉवर मोठा मोठा चिरून घ्यावा.
२. एक बटाटा घेउन त्याच्या मोठ्या फोडी करून घ्याव्यात.
३. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी.
४. त्यावर बटाट्याच्या फोडी घालून थोड्या परताव्यात व झाकण ठेऊन अर्धवट शिजू द्याव्यात.
५. आता फ्लॉवरच्या फोडी, व २ बारीक ठेचलेल्या मिर्च्या घालून, झाकण ठेवावे. गॅस बारीक ठेऊन बटाटे व फ्लॉवर पूर्ण शिजू द्यावेत. मधे मधे हलवायला विसरू नये.
५. चवीप्रमाणे मीठ, १/२ टीस्पून धान्याची पूड, १/२ टीस्पून जिऱ्याची पूड घालून मिसळावे व झाकण न ठेवता २ मिनिटे परतावे.
६. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गरम भाजी पोळीबरोबर वाढवी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा