दूधभोपळ्याची भाजी (पीठ पेरून) :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. १ & १/२ वाटी दूधभोपळा किसणीने किंव्हा फूड प्रोसेसर वापरून किसून घ्यावा.
२. दोन्ही हातांमध्ये दाबून त्यातील पाणी काढून टाकावे.
३. एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करावे व त्यात १/४ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/४ टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, व १/४ टीस्पून हळद घालावी.
४. त्यावर किसलेला दूधभोपळा घालून सर्व मिसळावे.
५. दूधभोपळ्यातील जवळजवळ सर्व ओलसरपणा जाईपर्यंत, मध्यम आचेवर परतावे.
६. त्यात चवीप्रमाणे तिखट व मीठ, १/२ टीस्पून साखर (पर्यायी), व ३ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन) घालून सर्व मिसळावे.
७. झाकण ठेऊन २-३ मिनिटे परतू द्यावे व मग गॅस बंद करावा. मात्र मधे एकदा हलवायला विसरू नये
८. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व ही भाजी पोळीबरोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा