उपमा / उप्पीठ :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. एका कढईत १ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १ वाटी रवा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजावा व एका बशीत काढून ठेवावा.
२. त्याच कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे व त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून हिंग, १ टीस्पून किसलेले आलं, ५-६ कढीलिंबाची पाने, २ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिर्च्या, २ वाळलेल्या लाल मिर्च्या, व १ & १/२ टीस्पून उडदाची डाळ घालावी. आवडत असल्यास १/४ वाटी शेंगदाणे (पर्यायी) घालावे.
३. डाळ गुलाबी रंगाची होईपर्यंत सर्व परतावे व मग १ बारीक चिरलेला कांदा घालावा.
४. कांदा थोडा परतून त्यात २ & १/२ वाट्या पाणी घालावे. पाण्यात चवीप्रमाणे मीठ, १ & १/२ टीस्पून लिंबाचा रस, व १ टीस्पून साखर घालावी.
५. व्हेजिटेबल उपम्यासाठी, पाण्यातच आपल्या आवडीच्या भाज्या (पर्यायी), जसे गाजराचे काप, मटारचे दाणे, किंव्हा फ्लॉवर ची फुले, मायक्रोवेव किंव्हा गरम पाण्यात थोड्या वाफवून घालाव्यात. पाण्याला उकळी येऊ द्यावी व गॅस बारीक करावा.
६. आता त्यात भाजलेला रवा घालून सर्व चांगले मिसळावे व झाकण ठेऊन ४-५ मिनिटे शिजू द्यावे. मधे एकदा हलवायला विसरू नये.
७. गॅस बंद करावा व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम उपमा खायला द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा