शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

चकली / Chakli

चकली (अंदाजे ३०-३५ चकल्यांसाठी ) 


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. एका कढईत २ वाट्या पाणी उकळायला ठेवावे. पाण्यात ३ टीस्पून तेल१ टीस्पून तीळचवीप्रमाणे तिखट (अंदाजे १ &१/२ टीस्पून)१/२ टीस्पून हळद व चवीप्रमाणे मीठ (अंदाजे १ & १/२ टीस्पून) घालावे. 


२. पाण्याला उकळी आल्यावर, गॅस बंद करून त्यात २ वाट्या चकलीची भाजणी* घालावी व सर्व चांगले मिसळावे. 


३. कढईवर झाकण ठेऊन १५-२० मिनिटे पीठ झाकून ठेवावे. नंतर पीठ हाताने चांगले मळून चकलीच्या सोऱ्याने प्लास्टिक किंव्हा पार्चमेंट पेपर वर चकल्या पडाव्यात. 

 

 

४. एकावेळी ४-५ चकल्या गरम तेलात तळून काढाव्यात. तळताना तेल मध्यम गरम असायला हवे. खूप गरम झाल्यास चकल्या आतून मऊ पडतात किंव्हा खूप मंद तळल्यास चकल्या फिसकटू  शकतात. 

 

*चकलीच्या भाजणीसाठी :

४ वाट्या तांदूळ, २ वाट्या हरभऱ्याची डाळ , १ वाटी उडदाची डाळ, १/२ वाटी धने, १/४ वाटी जिरे घ्यावेत. सर्व पदार्थ वेगवेगळे मूठ शेकी म्हणजे थोडे, किंचित गुलाबी रंगावर, भाजावेत. पूर्ण गार झाल्यावर अगदी बारीक दळावेत व मिसळावेत. तयार पिठाला चकलीची भाजणी असे म्हणतात. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा