आंब्याची डाळ (१० जणांसाठी )
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
एक वाटी हरभऱ्याची डाळ ५-६ तास पाण्यात भिजत घालावी. एका रोळीत उपसून पाण्याने स्वच्छ धुआवी. आता पाणी न घालता, ५-६ हिरव्या मिर्च्या घालून ग्राइण्डर मध्ये भरड वाटावी. त्यात चवीप्रमाणे मीठ, १&१/२ टीस्पून साखर, १ छोटी किसलेली कैरी, व १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. एका छोट्या कढईत ४ टेबल्स्पून तेल गरम करावे. त्यात २ टीस्पून मोहरी, १/२ टीस्पून हिंग, ८-१० कढिलिंबाची पाने, व २ वाळलेल्या लाल मिर्च्या घालून फोडणी करावी. ही फोडणी गार झाल्यावर वाटलेल्या डाळीवर घालावी. सर्व चांगले मिसळावे व खायला द्यावे. ही आंब्याची डाळ चैत्र महिन्यात करतात व कैरीचे पन्हं, ह्या पेयाबरोबर खायला देतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा