भरली भेंडी (२ जणांसाठी) :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
अंदाजे १५ भेंड्या (१ पाव) स्वच्छ धुऊन पुसून घ्याव्यात. सर्व भेंड्यांना उभी चीर पाडावी ज्यामुळे त्यांत मसाला भरता येईल. मसाल्यासाठी, ४ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन) घ्यावे. त्यात चवीप्रमाणे मीठ व तिखट, ४ टीस्पून धन्याची पूड, २ टीस्पून जिऱ्याची पूड, व १ टीस्पून आमचूर घालून मिसळावे. हा मसाला प्रत्येक भेंडीत अंदाजे १/२ टीस्पून भरावा. एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात मसाला भरलेल्या भेंड्या घालाव्यात. १ मिनिट तेलावर परतून गॅस बारीक करावा. वर झाकण ठेवावे व दर ४-५ मिनिटांनी हलवून भेंड्या पूर्ण शिजू द्याव्यात. आता उरलेला मसाला सर्व भेंड्यांवर घालून सर्व हलक्या हाताने मिसळावे व परत एकदा झाकून एक मिनिट वाफ येऊ द्यावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गरम पोळी किंव्हा फुलक्याबरोबर ही भाजी खायला द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा