वऱ्याचे तांदूळ व दाण्याचीआमटी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
तांदुळासाठी :
१. एक वाटी वऱ्याचे तांदूळ धुऊन घ्यावेत व त्यात ४ वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर उकळायला ठेवावेत.
२. पाणी उकळून तांदुळापर्यंत आल्यावर गॅस बारीक करावा व झाकण ठेऊन पूर्ण पाणी अटेपर्यंत शिजवावे.
आमटीसाठी :
१. एक वाटी दाण्याचे कूट घेऊन त्यात लागेल तसे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी.
२. त्यात ३ वाट्या पाणी घालून थोड्यावेळ बाजूला ठेवावे.
३. एका पातेल्यात २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून जिरे घालावेत. जिरे चुरचुरल्यावर त्यात ३/४ वाटी पाणी घालावे.
४. त्यातच ४-५ वाळलेली आमसुले घालून उकळी आणावी व ३-४ मिनिटे उकळू द्यावे.
५. आता वर तयार केलेली दाण्याच्या कुटाची पेस्ट त्यात घालावी व गॅस बारीक करावा.
६. चवीप्रमाणे मीठ व तिखट घालावे व मधे मधे हलवत आमटीला उकळी आणावी.
वाढण्यासाठी :
गरम गरम वऱ्याचे तांदूळ दाण्याच्या आमटी बरोबर वाढावेत. सोबत उपासाचे गोड लोणचे, बटाट्याचे किंव्हा साबूदाण्याचे पापड, व बटाट्याची उपासाची भाजी ही वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा