बटाट्याची उपासाची भाजी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. चार बटाटे उकडून सालं काढून घ्यावेत.
२. एका कढईत ३ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून जिरे घालावेत. जिरे चुरचुरल्यावर त्यात ३ हिरव्या मिर्च्या बारीक तुकडे करून घालाव्यात.
३. त्यावर बटाट्याच्या फोडी, व २ टेबलस्पून दाण्याचे कूट घालावे व सर्व सारखे करावे.
४. चवीप्रमाणे मीठ, १ टीस्पून साखर घालून एखादा मिनिट परतावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा