रविवार, १० मे, २०१५

बटाट्याचा रस्सा (उत्तर भारतीय पद्धतीचा) / Batatyacha Rassa

 बटाट्याचा रस्सा (उत्तर भारतीय पद्धतीचा) :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ छोटा कांदा, व १ छोटा टोमॅटो मोठा मोठा चिरून घ्यावा. १" मोठा आल्याचा तुकडा, ५-६ लसणाच्या पाकळ्या व चिरलेले कांदा व टोमॅटो सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटून, ग्रेवी करून घ्यावी. 


२. ४ मध्यम आकाराच्या बटाट्यांचे १" मोठे चौकोनी काप घ्यावेत. 


३. एका पातेल्यात १ & १/२ टेबलस्पून तेल गरम करून त्यात ग्रेवी घालावी. 

 ४. त्यात १ टीस्पून गरम मसाला१/२ टीस्पून तिखट घालून सर्व तपकिरी रंगाचे होईपर्यंत परतावे . 


५. १ टेबलस्पून टोमॅटो प्यूरी घालून परत एखादा मिनिट परतावे. 


६. आता त्यात बटाट्याच्या फोडी, २ वाट्या पाणी, १/२ वाटी मटारचे दाणे, व चवीप्रमाणे मीठ घालून  हलवावे व मध्यम आचेवर, झाकण ठेऊन बटाटे पूर्ण शिजू द्यावेत. 



७. आता गॅस बारीक करावा. झाकण काढून काही (५-६) बटाट्याच्या फोडी वेगळ्या काढाव्यात व कुस्करून परत रस्स्यात मिसळाव्यात. ह्यामुळे रस दाट होण्यास मदत होते. 

१०. झाकण काढूनच २ मिनिटे उकळू द्यावे व मग गॅस बंद करावा. 

११. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गरम गरम रस्सा पुरी  किंव्हा फुलाक्याबरोबर वाढावा. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा