रविवार, १० मे, २०१५

बटाट्याची भाजी (महाराष्ट्रीय पद्धतीची) / Batatyachi bhaji

बटाट्याची भाजी (महाराष्ट्रीय पद्धतीची) :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. ४ मध्यम आकाराचे बटाटे उकडून सालं काढून घ्यावेत. पूर्ण गार झाल्यावर त्यांचे १" मोठे चौकोनी काप करावेत. गरम असतानाच बटाटे चिरल्यास त्याचे खूप बारीक तुकडे होतात. त्यामुळे मोठ्या फोडी रहाण्यासाठी गार झाल्यावरच बटाटे चिरावेत. 


२. एका कढईत १ & १/२ टेबलस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, १/४ टीस्पून हळद, व ५-६ कढिलिंबाची पाने घालावीत. 

३. त्यात १/२ टीस्पून आल्याची पेस्ट१/२ टीस्पून मिरच्यांची पेस्ट  घालून थोडे परतावे. 


४.  गॅस बारीक करून बटाट्याच्या सर्व फोडी घालाव्यात व  हलक्या हाताने सर्व मिसळावे. 


५. १/२ टीस्पून साखर, व चवीप्रमाणे मीठ घालून  मिसळावे व बारीक गॅस वर २ मिनिटे परतू द्यावे. मग गॅस बंद करावा. 

६. वरून ताजे खोवलेले खोबरेबारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम भाजी पुरी, पोळी किंव्हा फुलाक्याबरोबर वाढावी. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा