शनिवार, ११ एप्रिल, २०१५

आप्पे / appe / appam

आप्पे (डोस्याच्या पिठाचे) :


(सर्व सामग्री  आहे)

१. २ वाट्या डोस्याचे पीठ घेऊन त्यात २ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन), १ छोटा कांदा बारीक चिरून, १ & १/२ टीस्पून आल्याची पेस्ट, १ & १/२ टीस्पून हिरव्या मिर्च्यांची पेस्ट, १/४ वाटी खोवलेले ओले खोबरे, व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व चांगले मिसळावे. 

२. आप्पे पात्राच्या प्रत्येक खान्यात एक थेंब तेल घालावे व त्यात वरील पीठ भरावे. प्रत्येक खान्यात वर थोडी जागा अप्पा फुगून यायला रिकामी ठेवावी. 

३.  झाकण ठेऊन बारीक आचेवर शिजू द्यावे. एका आप्याच्या मधोमध एक सुरी आत घालून तपासावे. सुरी बाहेर काढल्यावर ओले पीठ सुरीला लागलेले नसावे. 

४. सगळे आप्पे दुसऱ्या बाजूस उलटून टाकावेत व २ मिनिटे झाकण न ठेवता शिजू द्यावेत. 

५. गरम गरम आप्पे कुठल्याही कोरड्या चटणीबरोबर (जसे मोळगापोडी/ गन पावडर चटणी) किंव्हा ओल्या चटणीबरोबर (जसे कोथिंबिरीची चटणी किंव्हा शेंगदाण्याची चटणी किंव्हा टोमॅटोची चटणी), खायला द्यावेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा