सांभार :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. १ वाटी तूर डाळ स्वच्छ धुऊन त्यात २ वाट्या पाणी घालावे. व कुकर मध्ये ३ शिट्ट्या येईपर्यंत शिजवावे. ३ शिट्ट्या झाल्यावर गॅस बारीक करावा व ५ मिनिटांनी बंद करावा. कुकर गार झाल्यावर शिजलेली डाळ बाहेर काढावी व रवीने चांगली घुसळावी.
२. एक १" x १" वाळलेली चिंच १/२ वाटी पाण्यात भिजत घालावी. बाजारात मिळत असलेला तयार चिंचेचा कोळ वापरला तरी चालेल.
३. आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या जसे गाजर, दूधभोपळा, भेंडी, पडवळ, व शेवग्याच्या शेंगा, स्वच्छ धुऊन व साल काढून घ्याव्यात. त्यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत व थोड्या पाण्यात मायक्रोवेव मधे शिजवून घ्यावेत. शेवग्याच्या शेंगा घालायच्या असल्यास ४-५ शेंगा १ & १/२ वाटी पाण्यात १० मिनिटांसाठी उकळून घ्याव्यात.
४. एका पातेल्यात ४ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/४ टीस्पून हिंग, १/२ टीस्पून हळद, ४-५ कढिलिंबाची पाने, व एक कांदा उभा चिरून घालावा. कांदा पारदर्शक होईपर्यंत परतावा.
५. आता त्यात शिजलेली डाळ घालावी व आवडीप्रमाणे पाणी घालावे. मी अंदाजे १ & १/२ वाटी पाणी घातले. चवीप्रमाणे मीठ व तिखट घालावे.
६. भिजत घातलेली चिंच हाताने कोळून त्याचा रस सांभारात घालावा. तयार कोळ वापरल्यास साधारण १/२ टीस्पून घालावा. आता २ टीस्पून सांभार मसाला घालून सगळे हलवावे व मध्यम आचेवर उकळी आणावी. ३-४ मिनिटे उकळत ठेऊन मग गॅस बंद करावा.
७. गरम गरम संभार, इडली, डोसा, मेदू वडा, किंव्हा उत्तप्पा बरोबर द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा