शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

मेदू वडा / Medu Wada

मेदू वडा :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ वाटी उडदाची डाळ ४-५ तास पाण्यात भिजत घालावी. 

२. भिजलेली डाळ, १" आलं, व २ हिरव्या मिर्च्या घालून ग्राइंडर किंव्हा फूड प्रोसेसर मध्ये बारीक वाटावी. वाटाताना कमीत कमी पाणी घालावे, व चवीप्रमाणे मीठ ही घालावे. 

३. वाटलेले पीठ हाताने भराभर एकाच दिशेने फेटावे. ह्याने वडे हलके होतात. पिठाचा एक थेंब पाण्यात टाकून बघावा. पीठ पाण्यात तरंगायला हवे. जर पीठ बुडाले तर किंचित पाणी घालून आणखीन फेटावे. 

४. एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करावे. पिठाचा एक थेंब तेलात टाकल्यावर तो तरंगून लगेच वर यायला हवा. नाहीतर तेल आणखीन थोडे तापायची वाट पहावी. 

५. हाताने किंव्हा वडा-मेकर वापरून वडे बनविता येतात. वडा-मेकर वापरल्यास, तो पिठाने भरावा व सावकाश तेलातच वडे सोडावेत. हाताने केल्यास प्रथम हाताला थोडे पाणी लाऊन घ्यावे. थोडेसे पीठ बोटांवर घेऊन गोलाकार करावे व अंगठ्याने मधोमध भोक पाडावे. आता अलगद वडा तेलात सोडावा. 

६. गुलाबी रंगाचे होईपर्यंत वडे तळावेत. व एका पेपर टॉवेल वर काढावेत. 

७. गरम गरम वडे नारळाच्या चटणी बरोबर व सांभार बरोबर खायला द्यावेत. 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा