शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

रव्याचे लाडू / Rawyache Ladu

रव्याचे लाडू (३५-४० लाडूंसाठी )


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. एका कढईत १ & १/२ वाटी तूप घेऊन त्यात ४ वाट्या रवा,  खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.  


२. रवा भाजत आल्यावर त्यात २ वाट्या ओले खोवलेले खोबरे घालावे व ५ मिनिटे परतावे. भाजलेला रवा एका बशीत काढून ठेवावा. 

३. त्याच काढईत ३ & १/२ वाट्या साखरेचा एक तारी पाक* करून त्यात भाजलेला रवा घालावा. सर्व मिसळून गार व्हायला ठेवावे. 

साखरेचा पाक बनवायची कृती 
साखरेचा पाक तयार व्हायच्या आधी 

पाकाला अशी तार यायला हवी 

३. दर १/२ ते ३/४ तासानी सर्व मिश्रण हलवत रहावे. साधारण २-३ तासांनी हे मिश्रण कोरडे पण वळता येण्यासारखे झाले की हातानी गुठळ्या मोडाव्यात


४. आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड घालावी व लाडू वळावेत. वळताना एकेका लाडवाला वरून दिसेल असा बेदाणा लावावा. 


*एक तारी साखरेचा पाक (वरील चित्रे पहावीत): एका पातेल्यात साखर व ती बुडेपर्यंत पाणी घालून उकळायला ठेवावे. मधे मधे ढवळत राहावे. उकळी आल्यावर साधारण २-३ मिनिटांनी दोन बोटांमध्ये पाकाचा एक थेंब घेउन त्याचा चिकटपणा पडताळून बघावा. जेंव्हा बोटांमध्ये पाकाची व्यवस्थित एक तार दिसू लागेल, तेंव्हा गॅस बंद करावा. ह्याला एक तारी पाक असे म्हणतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा