शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

अडई / Adai

अडई (६ जणांसाठी)

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)


                                     

१ वाटी तांदूळ१/२ वाटी उडदाची डाळ१/२ वाटी हरभऱ्याची डाळ१/२ वाटी मुगाची डाळ१ टेबलस्पून प्रत्येकी चवळी, हिरवे मूग, मसूर, छोले, हरभरे (इतर कुठलेही कडधान्य घातले तरी चालते.  जसे, राजमा, पांढरे वाटाणे, मटकी, वगैरे). वरील सर्व ५-६ तासांसाठी भिजत घालावे. १"आलं४-५ लसणाच्या पाकळ्या५-६ मिर्च्या व वरील भिजलेले धान्य, जरुरीप्रमाणे पाणी घालून, सर्व ग्राइण्डर मध्ये थोडे भरड वाटावे. तयार पिठात १ बारीक चिरलेला कांदा घालावा. चवीप्रमाणे मीठ घालावे. वाटल्यास वरून आणखीन पाणी घालावे. भज्याच्या पिठा इतके पातळ असायला हवे. 

एका वेळेला साधारण ३ मोठे चमचे पीठ घेऊन गरम तव्यावर जाडसर पसरावे. मध्यम विस्तवावर झाकण ठेऊन शिजू द्यावे. एकदा उलटून दुसरी बाजू ही भाजून घ्यावी.  गरम गरम अडई कोथिंबीर चटणी बरोबर खायला द्यावे. 

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा