शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

डाळीचा परोठा / Dal Parotha

डाळीचा परोठा


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

सारणासाठी :    


१. १/४ वाटी हरभऱ्याची डाळ १ वाटी पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. 

२. सर्व पाणी काढून टाकावे व डाळ ग्राइंडर किंव्हा फूड प्रोसेसर मध्ये भरड वाटून घ्यावी. 

३. वाटलेली डाळ प्रेशर कुकर मधे  १५ मिनिटे एक शिट्टी येईपर्यंत शिजवावी. एक शिट्टी झाल्यावर गॅस बंद करावा व गार झाल्यावर डाळ बाहेर काढावी. 

४.  गार होण्यासाठी एका बशीत पसरून व गोळे मोडून ठेवावी. 

५. एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करावे व त्यात शिजविलेली डाळ घालावी. एकदा हलवून गॅस बारीक करावा. त्यात १/२ ते ३/४ टीस्पून गरम मसाला१ टीस्पून आमचूर१ टीस्पून तिखट व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मिसळावे. ५ मिनिटे किंव्हा ओलसरपणा जाईपर्यंत परतावे. मग गॅस बंद करावा व हे सारण बाजूला ठेवावे.


कणकेसाठी :

 वाटी कणीक, १/२ टीस्पून मीठ, १ टीस्पून तेल, हे सर्व एकत्र मिसळावे. आता पाण्याने पोळ्यांच्या कणकेप्रमाणे कणीक भिजवावी.


कृती :

१. कणकेचा ३" गोळा घेऊन थोडा लाटून घ्यावा. त्यात २-२ & १/२ टेबलस्पून सारण घालावे. सगळीकडून बंद करून वरूनही तोंड बंद करावे. 

२. हातानी थोडे चपटे करून त्याचा गोल १/२-३/४ सें.मी. जाड परोठा लाटावा. 

३. गरम तव्यावर  १/४ चमचा तेल सोडून, दोन्ही बाजूंनी भाजावा. 

४. लोणी, दही, व कोथिंबिरीच्या चटणी बरोबर  किंव्हा टोमॅटो चटणी बरोबर गरम गरम खायला द्यावा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा