शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

तिळगुळाच्या वड्या / Tilgul Wadi

तिळगुळाच्या  वड्या (३०-३५ वड्यांसाठी)


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे) 

एका कढईत १&१/२ वाटी गूळ घेऊन त्याचा पाक करायला गॅस वर ठेवावे. गूळ पातळ होऊन त्याचा फेस व्हायला लागताच गॅस बंद करावा. त्यात ३/४ वाटी भाजलेले तीळ व ३/४ वाटी भाजलेल्या तिळाचे कूट घालावे. त्यातच १/२ वाटी शेंगदाण्याचे कूट१/२ टेबलस्पून तूप१ टीस्पून दूध, व आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड घालावी. सर्व मिसळून गोळा करावा व गार व्हायच्या आत, तूप लावलेल्या पोळपाटावर घेऊन चौकोनी लाटावे. वडीची जाडी आवडीप्रमाणे ठेवावी . वरून १ टेबलस्पून  किसलेल्या खोबऱ्याचा कीस पसरून टाकावा, व परत थोडे लाटावे. पूर्ण गार झाल्यावर चौकोनी वड्या कापाव्यात. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा