शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

भेंडीची भाजी / Bhendichi bhaji

भेंडीची भाजी (२ जणांसाठी):

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१५-२० भेंड्या स्वच्छ धुऊन पुसून घ्याव्यात. प्रत्येक भेंडीचे १/२ सें. मी. गोल काप करावेत. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी१/४ टीस्पून हिंग, व १/२ टीस्पून हळद घालून फोडणी करावी. त्यात २ मिर्च्या उभ्या चिरून घालाव्यात व चिरलेल्या भेंड्या घाल्याव्यात. गॅस मध्यम आचेवर ठेऊन, दर २-३ मिनिटाने हलवत, भेंड्या रंग बदलेपर्यंत चांगल्या परताव्यात. किंचित काळपट झाल्यावर चवीप्रमाणे मीठ व १/२ टीस्पून साखर घालावी. एखादा मिनिट आणखी परतून गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व पोळी बरोबर खावयास द्यावी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा