1. १/२ वाटी छोले (पांढरे वाटाणे) ५-६ तास भिजत टाकावेत. लवकर हवे असल्यास, उकळत्या पाण्यात भिजत घालून झाकून ठेवावे. मग तासाभरात सुद्धा छोले चांगले भिजतात.
2. भिजल्यावर त्यात १ टीस्पून कसूरी मेथी घालावी. आता प्रेशर कुकर मध्ये उकडायला ठेवावे. तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस १/२ तास बारीक करून ठेवावा. कुकर गार झाल्यावर छोले बाहेर काढावेत. व त्यातील काही छोल्याचे दाणे अर्धवट कुस्करावेत.
ग्रेवी साठी: १ छोटा कांदा, १ टोमॅटो, १" आलं, व ४ लसणाच्या पाकळ्या, सर्व एकत्र मिक्सर मधून वाटून घ्यावे.
कृती:
1. एका पातेल्यात १ &१/२ टेबलस्पून तेल गरम करावे व त्यात वर बनविलेली ग्रेवी घालावी व २ टीस्पून छोले मसाला किंव्हा गरम मसाला घालून परतावी. सगळीकडून तेल सुटायला लागेपर्यंत परतावे.
2. मग उकडलेले छोले त्यात घालावेत व सर्व मिसळावे. चवीप्रमाणे मीठ घालावे.
3. आणखीन रस हवा असल्यास हवे तेवढे पाणी घालावे.
4. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा व पोळी, फुलका, पुरी किंव्हा भाताबरोबर खायला द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा