शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

डब्बू मिर्ची (पीठ पेरून) Dabbu Mirchi Pith Perun

डब्बू मिर्ची (पीठ पेरून) :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. २ मध्यम आकाराच्या डब्बू मिर्च्या अर्ध्या कापाव्यात व आतील बिया काढून टाकाव्यात. २. आता मिरच्यांचे १" मोठे चौकोनी काप करावेत. 


३. एका कढईत ४ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/२ टीस्पून जिरेचिमूटभर हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी. आता चिरलेल्या डब्बू मिर्च्या घालाव्यात व सगळे मिसळावे. 


४. गॅस बारीक करून झाकण ठेवावे व मिर्च्या मऊसर शिजू द्याव्यात. २-३ मिनिटांनी हलवावे व खूप मऊ होऊ देऊ नयेत. 

५. आता २ टीस्पून तिखट१/२ टीस्पून जिऱ्याची पूड१/२ टीस्पून साखर, व चवीप्रमाणे मीठ घालून मिसळावे. 

६. वरून ४ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन) पसरून घालावे व सगळे चांगले मिसळावे. झाकण ठेऊन २ मिनिटे शिजू द्यावे. 


७. ही भाजी गरम पोळीबरोबर नुसती, किंव्हा दह्याबरोबर वाढावी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा