मुगाची आमटी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१ वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी व २ वाट्या पाणी घालून कुकर मधे शिजवावी. ३ शिट्या होऊ द्याव्यात व मग ५ मिनिटांसाठी गॅस बारीक करून बंद करावा. कुकर गार झाल्यावर झाकण उघडून डाळ बाहेर काढावी. रवीने डाळ चांगली घुसळून घ्यावी व त्यात १ & १/२- २ वाट्या पाणी घालावे. एका पातेल्यात ४ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/४ टीस्पून हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी. त्यावर शिजलेली डाळ घालावी व गॅस बारीक करावा. चवीप्रमाणे मीठ, १ टीस्पून लसणाची पेस्ट, व १/२ टीस्पून हिरव्या मिर्च्यांची पेस्ट घालून १ उकळी आणावी. मधे मधे हलवायला विसरू नये कारण मुगाची डाळ पटकन पातेल्याला खाली लागते. गरम गरम आमटी पोळी किंव्हा भाताबारोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा