शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

कच्छी दाबेली / Kachchi Dabeli

कच्छी दाबेली :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

४ उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावेत.  त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालावा.  १ टेबलस्पून आल्याची पेस्ट, १ टेबलस्पून लसणाची पेस्ट व २ हिरव्या मिर्च्यांची पेस्ट करून त्यात घालावी. त्यातच १ टीस्पून धने पावडर१ टीस्पून गरम मसाला१ टीस्पून आमचूर पावडर१/२ टीस्पून काळे मिरे पावडर१/२ टीस्पून काळा मसाला (गोडा मसाला), व चवीप्रमाणे मीठ घालावे. त्यात १/२ वाटी डाळिंबाचे दाणे घालावेत. (डाळिंबाचे दाणे नसल्यास भाजके, खारवलेले किंव्हा बेसन लावलेले दाणे वापरले तरी छान लागतात). सर्व एकत्र कालवावे.  

                        वरील सारणासाठी अंदाजे पाच पाव (पाव भाजीचे पाव) लागतील. एका पावाचे मधोमध दोन भाग करून, एका भागावर थोडी चिंचगुळाची चटणी किंव्हा खजुराची गोड चटणी लावावी. वरील तयार केलेले अंदाजे ३-४ टेबलस्पून सारण पावावर पसरावे. पावाचा दुसरा भाग  त्यावर ठेवावा व तव्यावर दोन्हीकडून भाजून गरम गरम खायला द्यावे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा