शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

मिश्र डाळ / Mishra Dal

मिश्र डाळ :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १/२ वाटी तुरीची डाळ१/४ वाटी मुगाची डाळ , १/४ वाटी हरभऱ्याची डाळ, व १/४ वाटी मसूराची डाळ सर्व एकत्र मिसळून स्वच्छ धुआवे व ३ वाट्या पाणी घालून कुकर मधे ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे. 

२. तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बारीक करावा व ५ मिनिटांनी बंद करावा. कुकर गार झाल्यावर डाळ बाहेर काढावी व रवीने थोडीशी घुसळून त्यात लागेल तसे पाणी घालावे. मला ही डाळ दाट आवडते म्हणून मी त्यात 2 वाट्या पाणी घातले आहे. 

३. एका पातेल्यात ४ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १ टीस्पून जिरे१/४ टीस्पून हिंग१ टीस्पून हळद२ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिर्च्या५-६ कढिलिंबाची पाने१ बारीक चिरलेला कांदा१ टीस्पून आल्याची पेस्ट, व १ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण घालावा. १/४ टीस्पून गरम मसाला घालावा. 

४. कांदा व लसूण गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर परतावे. 

५. आता त्यावर शिजलेली डाळ घालावी व चवीप्रमाणे मीठ घालावे. २ टीस्पून लिंबाचा रस, व १ बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. 

६. एक उकळी आणून गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गरम गरम डाळ पोळी किंव्हा भाताबरोबर खायला द्यावी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा