शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

फरसबीची भाजी / Farasbi Bhaji

फरसबीची भाजी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

२५० ग्राम फरसबी च्या शेंगा शिरा काढून निवडून घ्याव्यात. स्वच्छ धुऊन बारीक चिराव्यात. २-३ चिमूट खायचा सोडा घेउन चिरलेल्या शेंगांना सगळीकडून लावावा. सोड्यामुळे शेंगांचा हिरवा रंग शिजल्यावर ही टिकण्यास मदत होते. एका कढईत २ & १/२ टीस्पून तेल गरम करावे, व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर चिमूटभर हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी. त्यावर चिरलेल्या शेंगा घालून चांगले हलवावे व चवीप्रमाणे मीठ१/२ टीस्पून साखर, व २ हिरव्या मिर्च्या अगदी बारीक चिरून किंव्हा पेस्ट करून घालाव्यात. सगळे मिसळून झाकण ठेवावे, व  दर ३-४ मिनिटांनी हलवत, शेंगा मऊ होईपर्यंत, मंद आचेवर शिजू द्यावे. आता १/४ टीस्पून धन्याची पूड, व १/४ टीस्पून जिऱ्याची  पूड घालावी. परत एखादा मिनिट झाकण ठेऊन शिजू द्यावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी  व गरम पोळी बरोबर खायला द्यावे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा