शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

लसणाची चटणी / Lasanachi chutney

लसणाची चटणी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ & १/२ टीस्पून लसणाच्या पाकळ्या, ३ टीस्पून तिखट, व चवीप्रमाणे मीठ, सर्व एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक वाटावे. 


२. त्यात २ टेबलस्पून दाण्याचे कूट* घालावे. १/२ वाटी खोबरे किसून व गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. 

३. भाजलेले खोबरे मिक्सर मध्ये बारीक वाटून चटणीत मिसळावे. 


४. त्यात १/४ टीस्पून साखर घालावी व सर्व चांगले मिसळावे. ५. ही चटणी, थोडे तेल किंव्हा तूप घालून किंव्हा कोरडीच, गरम पोळी बरोबर खायला खूपच चविष्ट लागते. 

* शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यावेत व भरड दाळावेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा