(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. सर्व शेंगांच्या शिरा काढून त्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात.
२. शेंगांचे बारीक अंदाजे १ सें. मी. मोठे तुकडे करून घ्यावेत.
३. दोन वाट्या शेंगांसाठी एका कढईत २ टीस्पून तेल गरम करावे. त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/२ टीस्पून जिरे, एक चिमूटभर हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी.
४. त्यात चिरलेल्या शेंगा घालून सर्व मिसळावे.
५. चवीप्रमाणे मीठ, १/२ टीस्पून साखर, व २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून किंव्हा ठेचून घालाव्यात.
६. झाकण ठेऊन ५-७ मिनिटे शिजू द्यावे. शेंगा जवळ जवळ शिजत आल्यावर त्यात १/२ टीस्पून धन्याची पूड, व १/२ टीस्पून जिऱ्याची पूड घालून परत झाकण ठेऊन ५-७ मिनिटांपर्यंत पूर्ण शिजू द्यावे व गॅस बंद करावा.
७. वरून ताजे खोवलेले खोबरे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम भाजी पोळीबरोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा