मसाला इडली:
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. चार इडल्या घेऊन त्याचे १" x १' काप करून घ्यावेत.
२. एका काढईत ३ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून राई (छोटी मोहरी) घालावी.
३. राई तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, १/२ टीस्पून हळद, ३-४ कढिपत्त्याची पाने, व १ टीस्पून उडदाची डाळ घालावी. डाळ गुलाबी होईपर्यंत परतावे.
४. त्यात १ छोटा कांदा बारीक चिरून, व २ टीस्पून रसम मसाला घालावा व कांदा पारदर्शक होईपर्यंत परतावे.
५. २ टोमॅटो बारीक चिरून घालावेत व चवीप्रमाणे मीठ घालावे. मीठ फक्त मसाल्यापुरतेच घालावे कारण इड्ल्यांमधे मीठ आधीच असते.
६. त्यावर इडल्यांचे काप घालावेत व हलक्या हाताने सर्व मिसळावे. एक मिनिट परतून गॅस बंद करावा.
७. मसाला इडली गरम असतानाच खायला द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा