शिरा :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. एका कढईत ४ टेबलस्पून तूप गरम करावे व त्यात १ वाटी रवा गुलाबी रंगाचा होईपर्यंत व खमंग वास सुटेपर्यंत भाजावा.
२. भाजलेल्या रव्यात ३ वाट्या आधण आलेले पाणी घालून सर्व मिसळावे व सगळे पाणी रव्यात मुरल्यावर गॅस बारीक करावा. झाकण ठेऊन २ मिनिटे शिजू द्यावे.
३. रव्यात १ वाटी साखर, १/४ टीस्पून वेलदोड्याची पूड, व ८-१० बेदाणे घालून सगळे मिसळावे व ५ मिनिटे झाकण ठेऊन शिजू द्यावे.
४. एका वाटीत ७-८ बदाम १/४ वाटी गरम पाण्यात भिजत घालावेत. १५ मिनिटात ते सोलता येतील. सोललेल्या बदामांचे पातळ उभे काप करावेत.
५. पाच मिनिटांनी गॅस बंद करावा व वरून बदामाचे काप घालून गरम शिरा खायला द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा