पचडी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. १/४ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, १/४ वाटी किसलेले गाजर, १/४ वाटी कोचालेली काकडी, सर्व एकत्र मिसळावे.
२. त्यात २ टेबलस्पून दाण्याचे कूट घालावे.
३. एका छोट्या काढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/४ टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, व १ उभी चिरून मिर्ची घालून एखादा मिनिट परतावे.
४. वरील फोडणी चिरलेल्या भाज्यांवर घालून त्यात चवीप्रमाणे मीठ, १ टीस्पून साखर, व १ टीस्पून लिंबाचा रस घालून सगळे मिसळावे.
५. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व तयार पचडी पोळीबरोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा