साबुदाणा वडा :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. २ वाट्या साबुदाणा ३-४ तास पाण्यात भिजत ठेवावा. भिजण्यासाठी साबुदाण्याच्या किंचित वरपर्यंत पाणी ठेवावे. भिजल्यावर साबुदाणा पाणी शोषून घेईल व फुलून वर येईल.
२. १/४ वाटी वऱ्याचे तांदूळ, ३/४ वाटी पाणी घालून मंद आचेवर भाताप्रमाणे शिजवून घ्यावेत व गार झाल्यावर भिजलेल्या साबुदाण्यात घालावेत.
|
शिजलेले वऱ्याचे तांदूळ |
३. दोन बटाटे उकडून सालं काढून घ्यावेत व कुस्करून साबुदाण्यात मिसळावेत. ४-५ हिरव्या मिर्च्या, चवीप्रमाणे मीठ, व ३ टीस्पून साखर घालावी.
४. जरुरीप्रमाणे पाणी घालून कणकेप्रमाणे पण हलक्या हाताने सर्व मळून घ्यावे.
५. आता पिठाचे एकसारखे छोटे छोटे गोळे करून चपटे करावेत व प्रत्येक वड्याला मध्ये बोटानी एक भोक पाडून घ्यावे.
६. एका कढईत तेल गरम करून सर्व वडे सोनेरी रंगापर्यंत तळून काढावेत व शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंव्हा केचप बरोबर गरम गरम खायला द्यावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा