मटार पोहे :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. २ वाट्या मध्यम जाडीचे पोहे एका रोळीत पाण्याने धुऊन निथळायाला ठेवावेत.
२. १/४ वाटी मटार थोडे पाणी घालून मायक्रोवेव मधे ३ मिनिटे शिजवून घ्यावेत.
३. एका कढईत ४ टीस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/४ टीस्पून हिंग, १ टीस्पून हळद, ५-६ कढिलिंबाची पाने, ४ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिर्च्या, व १ बटाटा खाली दाखाविलेल्या प्रमाणे त्रिकोणी काप करून घालावा.
४. झाकण ठेऊन बटाटा पूर्ण शिजू द्यावा.
५. आता १ बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परतावा.
६. त्यावर भिजविलेले पोहे घालून सर्व चांगले मिसळावे व गॅसअगदी बारीक करून ठेवावा.
७. शिजविलेले मटार, चवीप्रमाणे मीठ, २ टीस्पून साखर व २ टीस्पून लिंबाचा रस घालावा.
८. दोन मुठी पाणी पोह्यांवर शिंपडावे व झाकण ठेऊन ५-७ मिनिटे अगदी बारीक गॅस वर शिजू द्यावे. दर २ मिनिटांनी हलवायला विसरू नये.
९. वरून ताजे खोवलेले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, व बारीक शेव घालून गरम गरम पोहे खायला द्यावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा