गुरुवार, १४ मे, २०१५

अमसुलाचे / कोकमचे सरबत / Amsulache sarbat / Kokum sarbat

अमसुलाचे / कोकमचे सरबत :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. ३ टेबलस्पून म्हणजे अंदाजे ८-१० अमसुले १/२ वाटी गरम पाण्यात २० मिनिटे भिजत ठेवावीत. 


२. मग मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावीत. 


३. त्यात १ वाटी पाणी घालून सगळे मिसळावे व गाळण्याने गाळून, चोथा वगळून, रस बाजूला काढून घ्यावा. 

 

४. रसामधे १/४ वाटी साखर घालून, साखर विरघळेपर्यंत ढवळावे. हे मिश्रण अगोदर तयार करून ठेवावे. 


५. ऐनवेळी वरील ३/४ वाटी मिश्रणात १/२ वाटी पाणी, व चवीप्रमाणे मीठ (बाजारात मिळत असलेल्या अमसुलांना आधी पासूनच मीठ लावलेले असते हे लक्षात ठेवावे) घालावे. 

५. वरून १/४ टीस्पून जिऱ्याची पूड घालावी व हे सरबत थंड गार करून प्यायला द्यावे. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा