गाजर टोमॅटो कोशिंबीर :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. ३ गाजरं बारीक किसून घ्यावीत.
२. त्यात २ टेबलस्पून दाण्याचे कूट, चवीप्रमाणे मीठ, १/२ टीस्पून साखर, व १/२ टीस्पून लिंबाचा रस घालून सर्व मिसळावे.
३. एका छोट्या कढईत १ & १/२ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, व २ हिरव्या मिर्च्या उभ्या चिरून घालाव्यात. दोन मिनिटे परतून गॅस बंद करावा.
४. वरील फोडणी गाजारांवर घालावी व सर्व मिसळावे.
५. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून, ही झटपट व पौष्टिक कोशिंबीर पोळीबरोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा