सोमवार, ४ मे, २०१५

बेसनाचे लाडू / Besnache ladu

बेसनाचे लाडू (२५-३० लाडवांसाठी) :



(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. एका कढईत ४ वाट्या बेसन घेऊन त्यात १ & १/२ वाटी तूप घालावे. 


२. मध्यम आचेवर बेसन गुलाबी / तपकिरी रंगाचे होईपर्यंत खमंग भाजावे. 



३. कोमट झाल्यावर त्यात ३ & १/४ वाट्या बारीक दळलेली पिठीसाखर व १ टीस्पून वेलदोड्याची पूड घालावी व सर्व हाताने चांगले मळावे.

४. साधारण २" मोठे गोलाकार लाडू हाताने वळावेत. वळताना आवडीप्रमाणे प्रत्येक लाडवावर एक बेदाणा किंव्हा सोललेल्या बदामाचा एखादा काप लावावा. 


5. हे लाडू बरेच महिने टिकतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा