चिंचगुळाची भेंडी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. १५-२० भेंड्या (अंदाजे पाव किलो) घेऊन त्याचे १ सें. मी. मोठे काप करावेत. १" वाळलेल्या चिंचेचा तुकडा थोड्या गरम पाण्यात २० मिनिटे भिजवून ठेवावा.
२. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, १/२ टीस्पून हळद, व चिरलेल्या भेंड्या घालून ५-७ मिनिटे परतावे. सर्व भेंड्यांचा चिकटपणा जाऊन त्या जवळ जवळ पूर्ण शिजू द्याव्यात.
३. आता भिजविलेल्या चिंचेचा कोळ घालावा. चिंचेच्या दुप्पट गूळ (अंदाजे २" मोठा तुकडा), व १/४-१/२ वाटी पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ व लाल तिखट घालावे व सर्व हलवून, झाकण ठेऊन २-३ मिनिटांसाठी पूर्ण शिजू द्यावे.
४. गॅस बंद करून गरम भाजी पोळी बरोबर वाढावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा