भडंग :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
१. ४ वाट्या कोल्हापुरी चुरमुरे एका कढईत किंव्हा मायक्रोवेव मधे १-२ मिनिटे गरम करून कुरकुरीत करून घ्यावेत.
२. एका वाटीत ३ टेबलस्पून तेल घेऊन त्यात १ टीस्पून धन्याची पूड, १ टीस्पून जिऱ्याची पूड, १ टीस्पून मेतकूट (पर्यायी), २ टीस्पून साखर, १ टीस्पून तिखट, व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व एकत्र मिसळावे.
३. हे तेल व मसाल्यांचे मिश्रण चुरामुऱ्यावर घालावे व चांगले मिसळावे.
४. एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात १ & १/२ टेबलस्पून मोहरी, १/४ टीस्पून हिंग, व १/२ टीस्पून हळद, व १०-१२ कढिलिंबाची पाने बारीक चिरून घालावीत.
५. १/२ वाटी शेंगदाणे घालून ते गडद रंगाचे होईपर्यंत परतावेत व गॅस बंद करावा.
६. वरील फोडणी कोमट झाल्यावर चुरामुऱ्यावर घालावी व सर्व मिसळावे.
७. पूर्ण गार झाल्यावर भडंग हवाबंद डब्यात भरून ठेवावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा