१. अंदाजे १०-१२ तोंडली स्वच्छ धुऊन घ्यावीत व खाली दाखविल्याप्रमाणे प्रत्येक तोंडल्याला दोन चिरा पाडून घ्याव्यात.
२. १/४ -१/२ वाटी दाण्याचे कूट घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ, १ टीस्पून तिखट, ३ टीस्पून काळा/ गोडा मसाला, व १ टीस्पून किसलेला गूळ घालावा. सर्व मिसळून मसाला तयार करून घ्यावा.
३. एका वेळी एक तोंडले घेऊन त्याच्या चिरांमध्ये मावेल इतका मसाला भरावा. अश्याप्रकारे सर्व तोंडली मसाल्याने भरून घ्यावीत.
३. एका कढईत ४ टीस्पून तेल घालून त्यात १/४ टीस्पून मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, व १/४ टीस्पून हळद घालावी.
४. त्यात भरलेली तोंडली घालून थोडे परतावे व त्यात १/२ वाटी पाणी घालून व झाकण ठेऊन मंद आचेवर शिजू द्यावे. मधे मधे हलक्या हाताने हलवायला विसरू नये.
५. तोंडली मऊसर शिजल्यावर त्यात उरलेला मसाला व वाटल्यास आणखीन थोडे पाणी घालावे.
६. २ मिनिटे आणखीन शिजू द्यावे व गॅस बंद करावा.
७. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व भरली तोंडली पोळीबरोबर गरम गरम वाढावीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा